बहुजननामा ऑनलाईन – तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कूच बेहार येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “जर जनतेला चित्रपट पाहायचे असतील तर ते गांधीजी, आंबेडकरजी अशा महापुरुषांचे जीवनावरील आधारित चित्रपट पाहतील. मोदींचा चित्रपट लोकांनी पाहावा यासाठी त्यांचं भारताच्या विकासामध्ये काय योगदान आहे.”
दरम्यान, आगामी लोकसभेच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिलगुरी येथील एका जाहीर सभेमध्ये बोलताना ममतांना ‘स्पीडब्रेकर दीदी’ संबोधले होते तर ममतांनी मोदींना प्रतिउत्तर देताना त्यांना ‘एक्सपायरी बाबू’ संबोधलं होत. अशातच आता आज ममतांनी मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला असून याला मोदी कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.