अकोला : बहुजननामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणूकीची जय्यत तयारी सुरू आहे. अनेक नेते आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आमदारकीचा उमेदवारी मिळवी म्हणून पक्षांतर करत आहेत. परंतू पक्षाची आमदारकीसाठी ‘एबी फॉर्म’ महत्त्वाचा आहे. शिवसेना पक्षान काल राज्यात अनेक ठिकाणच्या उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ दिले. त्यांपैकी अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातून नितीन देशमुखांना शिवसेनेचा ‘एबी फॉर्म’ मिळाल्याने त्यांचं तिकीट कन्फर्म झालं आहे. निवडणूक प्रक्रियेत ‘एबी फॉर्म’ला खूप महत्त्व आहे. यामुळे संबंधित उमेदवार हा ‘एबी फॉर्म’ देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमदेवार समजला जातो आणि त्याला त्या पक्षाचं अधिकृत चिन्हंही दिलं जातं.
एबी फॉर्म संर्दभातील महिती :
एबी फॉर्म’ हा पक्ष आणि त्या पक्षाचं अधिकृत चिन्हं मिळवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.
ए फॉर्म’ हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा गरजेचा असतो.
ए फॉर्म’वर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.
‘बी फॉर्म’ हा अधिकृत उमेदवारासंदर्भातील दस्तावेज असतो.
‘बी फॉर्म’वर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सूचवलेल्या आणखी एका उमेदवाराचं नावं असतं. कारण जर पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला उमेदवाराला निवडणूक आयोग अधिकृत म्हणून घोषित करू शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी निवडणूकीचे तिकीट मिळविण्यासाठी घमासान सुरू आहे.
तसेच आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. त्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवाराला राजकीय पक्षाकडून ‘ए’ फॉर्म दिला जातो. त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, याची माहिती द्यावी लागते. उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवाराला कागदपत्रं, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात.
जर त्या उमेदवाराचा फॉर्म काही कारणास्तव ग्राह्य धरला नाही. तर अशा वेळी पक्षाचा कुणीतरी पर्यायी उमेदवार असावा यासाठी राजकीय पक्षांकडून ‘बी’ फॉर्म दिला जातो. त्यात पहील्या उमेदवारासह पर्यायी उमेदवाराचं नाव दिलेलं असतं. राज्यसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीसाठी हे फॉर्म ‘एए’ आणि ‘बीबी’ म्हणून ओळखले जातात.
Visit : bahujannama.com