मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पहिल्याच यादीत 22 उमेदवारांची नावे जाहीर करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदावारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 180 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ही यादी जाहीर केली आहे. इतकेच नाही तर उद्या संध्याकाळपर्यंत 288 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर होईल असेही त्यांनी सांगितले.
कर्जत जामखेडमधू अरूण जाधव, लातूर शहरातून मनियार राजासाब, जळगावमदून शेख शफीअब्दुल नबीशेख, शिवाजीनगर अनिल कुऱ्हाडे यांच्यासह 22 मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले आहेत. यात पुण्यातील जागांचाही समावेश आहे.
एमआयएम वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडली होती आणि त्यानंतर एमआयएमने आपल्या दोन याद्या जाहीर केल्या होत्या. यानंतरही वंचित बहुजन आघाडी एमआयएमसोबत युती करण्याच्या प्रतिक्षेत होती. यानंतर अखेर आता वंचितने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यात उमेदवारांच्या जातीचा उल्लेख केला आहे. युतीच्या आशा मावळल्याचे दिसत असले तरीही अखेरपर्यंत काय होईल हे काही सांगता येत नाही.
Visit : bahujannama.com