मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – भाजप शिवसेना युती आणि जागावाटपासंदर्भात २ दिवसांपासून सातत्याने बैठका आणि चर्चांचे गुऱ्हाळ सुरु होते. अशातच लवकरात लवकर म्हणजे आज रात्री बारा पर्यंत महायुतीची अधिकृत घोषणा केली जाणार असून जागावाटप पूर्ण झाले आहे असे वक्तव्य महसूलमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
CM आणि शिवसेना प्रमुख करणार घोषणा :
महायुतीत भाजप-शिवसेनेसह इतर मित्रपक्ष असतील. तसेच युती आणि महायुतीचं जागावटप पूर्ण झाले असून काही वेळातच महायुतीची अधिकृत घोषणा पत्रकाद्वारे केली जाईल असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे महायुतीची अधिकृत घोषणा करतील असे ते म्हणाले.
जागा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे असे विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, “सहमती हा महायुतीचा फॉर्म्युला आहे.” शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्याचे ठरलेले नाही असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या उमेदवारांची यादी पुढील काही तासातच जाहीर होईल असे सांगतिले. तसेच उमेदवारांचे एबी फॉर्म पाठवण्यात आले आहेत. उमेदवार यादी जाहीर होताच संबंधित उमेदवाराला एबी फॉर्म मिळतील असे त्यांनी स्पष्ट केले.
Visit : bahujannama.com