नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा कॅप्टल कूल महेंद्रसिंह धोनी सध्या काश्मीरमध्ये लष्कराच्या सेवेत आहे. धोनीने लष्करासोबत काम करण्यासाठी क्रिकेटला दोन महिन्यांसाठी रामराम ठोकला आहे. त्यानंतर धोनीची पोस्टींग काश्मीरमधील विक्टर फोर्समध्ये करण्यात आली. विक्टर फोर्सशी सलग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच धोनीची झलक पहावयास मिळाली आहे. जवांनासोबत व्हॉलीबॉल खेळतानाचा धोनीचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.
https://twitter.com/msdfansofficial/status/1157906248370511872
सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये धोनी टीमसाठी सर्व्हिस करतो आहे. दि. 31 जुलै रोजी धोनी लष्करी सेवेत दाखल झाला असून दि. 15 ऑगस्टपर्यंत तो लष्कराच्या बटालियन सोबत राहणार आहे. बटालियनसोबत राहून धोनीला पेट्रोलिंग, गार्ड आणि पोस्ट डयुटीची जिम्मेदारी देण्यात आली आहे. सन 2011 मध्ये लष्करासोबत जोडल्या गेलेल्या धोनीची सन 2015 मध्ये आग्रा येथील ट्रेनिंग कॅम्पमध्ये आर्मीच्या विमानातून 5 पॅराशूट जम्प घेवून पॅराटपूर म्हणून निवड झाली होती.
सन 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनी लष्करासोबत जोडला गेला होता. त्याच्यासोबत ऑलम्पिक गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्रा देखील लष्करासोबत जोडला गेला होता. धोनीकडे लेफ्टनंट कर्नलची मानद रँक आहे. पॅराशूट रेजिमेंटच्या 106 पॅरा बटालियनचा धोनी सदस्य देखील आहे. तेव्हापासुन बहुसंख्य वेळा धोनी लष्करी वेशात आपल्याला पहावयास मिळाला आहे. ज्यावेळी धोनीला पद्म पुरस्कार मिळाला होता त्यावेळी तो घेण्यासाठी धोनीने लष्कराचा ड्रेस घातला होता. सध्या धोनी विक्टर फोर्ससोबत जोडला गेला असून ते युनिट काश्मीरच्या सर्वात जास्त संवेदनशील आणि दहशतवाद्यांमुळे प्रभावित असलेले शोपिया आणि अनंतनाग जिल्हयात काम करते. सैनिकांसोबत व्हॉलीबॉल खेळताना धोनीने लाल रंगाचा टी-शर्ट आणि काळया रंगाची पॅन्ट घातली आहे.
- पावसाळ्यात घ्या वेगवेगळ्या प्रकारचा चहा, होतील ‘हे’ फायदे
- थंडीच्या दिवसातही ओठ गुलाबी, सुंदर राहण्यासाठी ‘हे’ ६ उपाय, जाणून घ्या
- ‘अपेंडिक्स’ आजाराचे असू शकतात ‘हे’ ८ संकेत, याकडे करु नका दुर्लक्ष
- ‘किडनी स्टोन’चा त्रास असेल तर ‘हे’ पदार्थ टाळा
- काही मिनिटांमध्ये उतरेल ताप, करुन पाहा ‘हे’ ११ सोपे उपाय
- जास्त किंवा कमी झोपेमुळे आजारी पडू शकता, ‘हे’ ४ नियम आवश्य पाळा
- शरीराच्या ‘या’ ८ भागांवर सूज आल्यास करु नका दुर्लक्ष, गंभीर आजारांचे संकेत