नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेक्नोलॉजीच्या सहाय्याने एखाद्या मृत व्यक्तीला तुम्ही भेटू शकता. अलीकडेच असा एक किस्सा कोरियातील एका टेलिव्हिजन शोमध्ये पहायला मिळाला आहे. ‘मिटिंग यू’ नावाच्या टीव्ही शोमध्ये एक आई तिच्या मुलीला भेटते. या मुलीचा मृत्यू 2016 मध्ये झाला होता. या शोमध्ये आईला तिच्या 7 वर्षाच्या मुलीला भेटण्यासाठी व्हर्चुअल रिएलिटीचा वापर करण्यात आला आहे.
या आश्चर्चकित टेक्नोलॉजीमुळे मुलीच्या मृत्यूनंतर 4 वर्षांनी एक आई तिच्या मुलीला भेटते फक्त एवढेच नाही तर तिच्याशी संवादही साधते. या संवादामध्ये मुलीने आईला सांगितले की, तिला सध्या कोणत्याच प्रकारचा त्रास नाही. आईला आपल्या मुलीचा स्पर्श व्हावा म्हणून यासाठी टच सेन्सेटिव्ह ग्लव्स आणि ऑडीओचा वापर देखील करण्यात आला होता. आयोजकांनी आईला मुलीला भेटण्यासाठी वाइव व्हर्चुअल रिएलिटी हेडगियर देण्यात आले होते. त्यानंतर आईला एका गार्डनमध्ये नेण्यात आले होते. आई आणि मुलीची भावूक भेट झाली. यामध्ये मुलीने आईला सांगितले की, मला तुझी खूप आठवण येते.
कोरियाची कंपनी (Munhwa Broadcasting Corporation ) ने या मुलीचा चेहरा डिझाईन करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. यामध्ये त्यांनी मृतक मुलीचा चेहरा, शरीर आणि आवाज हुबेहुब ठेवण्यासाठी खूप कसरत केली कारण आईला आपल्या मुलीसोबत असल्याचा भास होईल. सुरुवातीलाच आईच्या मनात आपल्या मुलीला जवळ घेण्यासाठी चलबिचल सुरु होती. त्यांनंतर आईने मुलीच्या सांगण्यावरुन तिचा हात पकडला. हात पकडताच आईच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. हा कार्यक्रम पाहणारे मुलीचे वडील, भाऊ-बहिण यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. यानंतर मुलीने आईला सांगितले की, मी थकले आहे आणि मला झोपायचे आहे. ज्यानंतर तिने आपल्या आईला निरोप दिला. थोड्यावेळाने या व्हर्चुअल प्रवासाचा शेवट करण्यात आला.