मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – चीनमध्ये कोरोना व्हायरसने अनेकांचे बळी जात असून चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरस होत असल्याची चर्चा होत आहे. पण खरचंच चिकन खाल्ल्याने कोरोना होतो का ? कोरोनामुळे मृत्यू झालेलेही चिकन खात असतील का, असा प्रश्न पडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसमुळे अलर्ट घोषित केला आहे.
अंड किंवा चिकन खाण्याअगोदर ते चांगल्या प्रकारे शिजवायला हवे. अशातही अंडी आणि चिकन खाण्यासाठी काही प्रमाणात शंका व्यक्त केली आहे. दरम्यान कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून खबरदारी बाळगली जात आहे, असे या अलर्टमध्ये मंत्रालयाने सांगितले आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे भारतात चिकनचा खप कमी झाला असून भारतात १० ते १५ टक्के चिकनची मागणी कमी झाली आहे. मागील वेळेस सार्स व्हायरसमुळे चिकनच्या मागणीत घट झाली असून यंदाही चिकन प्रेमींनी चिकनकडे पाठ फिरवली आहे.
तसेच वैज्ञानिक संशोधनात हा विषाणू अजूनही चीनमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत असल्याचे वैज्ञानिक संशोधनात दिसून आले आहे. पण चिकनमध्ये अजूनही विषाणूचा संसर्ग आढळलेला नाही. त्यामुळे चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.