नवी दिल्ली : वृत्तसंस्था- घोड्याच्या रेसिंग दरम्यान जॉकी आणि घोड्यांच्ये अनेक निरनिराळे किस्से पाहायला मिळतात. अशावेळी जोरदार रेस पाहायला मिळते. अशा या जोरदार रेसमध्ये एखादा घोडा जर जॉकीला दाताने चावण्याचा प्रयत्न करत असेल तर यापेक्षा जास्त आश्चर्यकारक आणखी काय असू शकतं.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील घोड्यांच्या रेसचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. यात एका घोड्याने आपल्या प्रतिस्पर्धी जॉकीवर हल्ला करत दाताने चावण्याचा प्रयत्न केला. कारण तो घोडा रेसमध्ये त्याच्या पुढे जात होता.
#MaisonsLaffitte
Dans l'emballage final du Prix Joubert, Palomba (@MaxSamGuyon / C. Laffon-Parias) a mordu le bras de François-Xavier Bertras. Grande favorite, elle finit deuxième derrière Lucky Lycra. pic.twitter.com/N6SX4N0TJv— Equidia (@equidia) September 4, 2019
हे पूर्ण प्रकरण पॅरिसमधील मेसन रेसकोर्समधील आहे. ज्या घोड्याने हल्ला केला त्याचे नाव पालोम्बा, आणि जॉकीचे नाव झेवियर बर्ट्रास आहे. व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, घोड्याने जॉकीवर कशा प्रकारे हल्ला केला आहे.
या घटनेत झेवियर बर्ट्रासला कोणतीही इजा झाली नाही. रेसनंतर त्याने आपला हात पाहिला जेथे घोड्याने चावा घेण्याचा प्रयत्न केला होता. बर्ट्रासने मान्य केलं की, रेसदरम्यान घोड्याने त्याच्यावर तीनवेळा हल्ला केला होता. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रियाही दिली आहे.