मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळं मार्चपासून देशात लॉकडाऊन आहे. फिल्मी आणि टीव्ही इंडस्ट्रीला तर टाळचं लागलं होतं. मिशन बिगीन अगेनमध्ये आता महाराष्ट्र सरकारनं मात्र गाईडलाईन्ससोबत शुटींगला परवागनी दिली आहे. नव्या गाईडलाईन्सनुसार, कोणताही 65 वर्षांहून अधिक वयाचा व्यक्ती, गर्भवती महिला, किंवा 10 वर्षांहून लहान मुलं, कलाकार किंवा स्टाफचे पार्टनर आदी लोक सेटवर नसतील. मनोरंजन क्षेत्रानं ज्येष्ठ कलाकारांच्या शुटींगला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. परंतु सरकारनं ही मागणी फेटाळून लावली. दरम्यान ज्येष्ठ कलाकारांवर शुटींगसाठी बंदी घातल्याच्या निर्णयावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
— TimePass (@TimePassTalks) July 25, 2020
विक्रम गोखले म्हणाले की, “65 वर्षांपुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्यामुळं सरकारनं त्यांन परवानगी द्यावी. या निर्णयामुळं ज्येष्ठ कलाकार भिकेला लागतील. म्हणून त्यांना काम करण्याची परवानगी द्यावी.” अशी मागणी त्यांनी केली आहे.
विक्रम गोखले पुढे म्हणाले की, “असा कायदा आणण्यासआधी राजकारणातील 60 वर्षांपुढील नेत्यांनी राजीनामे द्यावे. त्यांनी आधी निवृत्त व्हावे” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.