पुणे : बहुजननामा ऑनलाईन– Vikram Gokhale Health Update | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर (वेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. आता विक्रम गोखले यांचे शरीर उपचारांना साथ देत असून, त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासन आणि त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विक्रम गोखले यांना गेले 48 तास कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. आता त्यांनी डोळे उघडले आहेत.
तसेच ते हातापायांची हालचाल देखील करत आहेत.
कदाचित त्यांना पुढील 48 तासांत कृत्रिम श्वसन यंत्रणेवरुन काढण्यात येईल.
त्यांचा रक्तदाब आणि हृदय उत्कृष्ट आहे, अशी माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंवाद अधिकारी शिरीष याडगिकर यांनी दिली आहे. (Vikram Gokhale Health Update)
Web Title :- Vikram Gokhale Health Update | vikram gokhale is showing steady and slow recovery says shirish yatgikar pro dinanath mangeshkar hospital pune
हे देखील वाचा :
Pune Crime | भांडणे मिटविण्यासाठी गेलेल्या युवकासह मित्रावर कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न
Deepak Kesarkar | ‘राज्यपालांबद्दलची भूमिका केंद्राला कळवली, पण जर भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल, तर…’