पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पानशेत येथे झालेला वाद मिटविण्यासाठी गेलेला युवक व त्याच्या मित्रावर तिघांनी कोयत्याने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी आसिफ सरदार जमादार (वय १९, रा. आंबेगाव गावठाण) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७८७/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शुभम ऊर्फ नाना नारायण दळवी (रा. आंबेगाव गावठाण) याला अटक केली आहे, तर त्याचे साथीदार प्रेम शिंदे आणि आकाश ऊर्फ अॅकी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आंबेगाव बुद्रुक येथील गायमुख चौकात बुधवारी रात्री आठ वाजता घडला. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानशेत येथे झालेला वाद मिटविण्यासाठी फिर्यादी गायमुख चौकात
आले होते. त्यावेळी फिर्यादी व किरण भंडारी यांना आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली.
त्यामुळे दोघेही घाबरुन पळून जाऊ लागले. तेव्हा शुभम दळवी याने फिर्यादी यांच्या पाठीमध्ये कोयत्याने वार केला.
किरण भंडारी यांच्या डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले.
पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दळवी याला अटक केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Attempted murder by stabbing a youth with a friend who went to settle a quarrel
हे देखील वाचा :