गडहिंग्लज : बहुजननामा ऑनलाईन – जनता दल यावेळी आगामी विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीला साथ देणार आहे. जनता दल आणि वंचित सोबत निवडणूक लढणार असून शेकाप, लाल निशाणला सोबत घेतले जाणार आहे. याबद्दलची चर्चा ३१ जूलै रोजी होणाऱ्या बैठकित केली जाणार असल्याचे जनता दलाचे माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक व वेगवेगळ्या प्रश्नांवरील आंदोलनाची चर्चा करण्यासाठी संकेश्वर रोडवरील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी शिंदे अध्यक्षस्थानी होते. तर तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, नगराध्यक्षा स्वाती कोरी, माजी सभापती सुभाष देसाई, सिद्धण्णा देसाई हे उपस्थित होते.
जनता दल हे कुटुंब आहे. एकेका कार्यकर्त्याची तिसरी पिढी पक्षात काम करते. त्यामुळेच जनता दल अभेद्य आहे. मी तत्कालीन अध्यक्ष बी. टी. पाटील दोघांनीही उपोषण केल्याने चित्रीला टोकन निधी मिळाला.
कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकरच्या पथकाने छापे टाकले. हा प्रकार क्लेषकारक आहे. विरोधकावर हल्ला करण्याचे षडयंत्र सत्ताधारी पक्षाने रचले आहे. त्याचा प्रतिकार करण्याचा आमचा निर्धार आहे. असे ते म्हणाले.
तर १९९९ च्या विधानसभा निवडणूकीत माघार घेऊन बाबा कुपेकरांना शरद पवारांच्या आग्रहास्तव पुढे चाल दिली. ती चूक पुन्हा करणार नाही. त्यासाठी वंचितची साथ देण्यावर विचार सुरु आहे.