पुणे : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीतून बंडखोरी केल्यानंतर लक्ष्मण माने यांनी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी हा पक्ष सुरु केला. त्या पक्षातर्फे लवकरच भाजप भगाव संविधान बचाव अभियान सुरु केले जाणार आहे. अशी घोषणा लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केली.
महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे येत्या सोमवारी स्थापना अधिवेशन बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडणार होते. परंतु काही कारणास्तव तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. पक्षाच्या वाटचालीसाठी राज्यात अमरावती, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, औरंगाबाद, सोलापूर, लातूर, कोल्हापूर, पुणे, जळगाव, नाशिक, मुंबई या ठिकाणी भाजप भगाव संविधान बचाव अभियान पोहोचविले जणार आहे. तसेच महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी हाजी इम्तियाज पिरजादे यांची तर पश्चिम महाराष्ट्राचे पक्ष प्रवक्ता म्हणून पडद्याआड या पुस्तकाचे लेखक साथी जसराज रजपुत यांची निवड करण्यात आली आहे. असे त्यांनी सांगितले.