बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अॅक्ट्रेस आलिया भट (Alia Bhatt) एकमेकांना डेट करत आहेत. हे सर्वांनाच माहित आहे. लवकरच दोघं लग्न करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. चाहत्यांनाही त्यांच्या लग्नाची खूप दिवसांपासून आतुरता आहे. अशात आता रणबीर कपूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. यात रणबीर एका महिला पत्रकाराला माझ्या लग्न करशील असा सवाल करत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, रणबीर कपूर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत आहे. यादरम्यान एक महिला पत्रकार त्याला म्हणते, या कपड्यांमध्ये तू परफेक्ट नवरदेव असल्या सारखा वाटत आहे. पण तू लग्न कधी करणार ? यावर रणबीर तिला म्हणतो, तुझं लग्न झालयं का. तू माझ्याशी लग्न करशील का मी करेन. रणबीरनं विनोदी पद्धतीनं दिलेलं हे उत्तर सर्वांचं लक्ष वेधत आहे.
सध्या रणबीरचा हा व्हिडीओ सोशलवर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहे.
रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात काम करताना दिसणार आहे. खास बात अशी की सिनेमात तो गर्लफ्रेंड आलिया भट सोबत काम करणारआहे. या सिनेमाच्या निमित्तानं रणबीर-आलिया पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. याशिवाय रणबीर शमशेरा या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.