बहुजननामा ऑनलाइन टीम – हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज जयंती आहे. याच दिवशी भारतात राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा करण्यात येत असतो. सोबतच या दिवशी राष्ट्रीय क्रिडा पुरस्काराचं वितरणही होत असतं. परंतु सध्या कोरोना संकट असल्यानं वेगळ्या पद्धतीनं राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं आहे.
क्रिडा पुरस्कार वितरण सोहळा यावेळी कोरोनामुळं राष्ट्रपती भवनात न होता ऑनलाईन पद्धतीनं झाला. यावेळी राष्ट्रपती हे भवनातच होते. परंतु खेळाडू मात्र क्रीडा प्राधिकरणाच्या सेंटरमध्ये दाखल झाले होते. विविध 11 केंद्रातून एकूण 60 खेळाडूंनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
https://twitter.com/jaspalrana2806/status/1299607320138186752?s=20
याबाबत माहिती देताना भारतीय क्रिडा प्राधिकरणानं सांगितलं की, “यावर्षी एकूण 74 खेळाडूंना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार होतं. परंतु 74 पैकी 60 खेळाडू या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. कारण काही खेळाडूंना कोरोना झाला आहे. काही खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत. काही खेळाडू असे आहेत जे देशाबाहेर आहेत. त्यामुळं 14 खेळाडू असे आहेत जे या सोहळ्याला उपस्थि राहणार नाहीत” असही प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
सध्या सर्व संघ आयपीएलसाठी युएईमध्ये दाखल झाले आहेत. रोहित शर्मा आणि इशांत शर्मा हेदेखील संघासोबत गेले आहेत. त्यामुळं ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. विनेश फोगाटसह 4 खेळाडूंना कोरोना झाला आहे. त्यामुळं तेही उपस्थित राहू शकले नाहीत.
भारताच्या महिला हॉकिच्या संघाच्या कर्णधार राणी रामपाल हिला खेल रत्न पुरस्कार मिळणार होता. राणी यावेळी पीपीई किट घालून गेली होती. सोहळ्यात तिनं हे किट काढलं आणि खास पेहरावात पुरस्कार स्विकारला. इतर खेळाडूंनी देखील पुरस्कार स्विकारताना सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली होती.