बंगळुरू : वृत्तसंस्था – कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार, गिरीश कर्नांड यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. गिरीश यांनी कन्नडसोबत हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये काम केलं. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अशा सर्व पातळ्यांवर त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला. १९ मे १९३८ मध्ये माथेरानला त्यांचा जन्म झाला होता. १९९८ मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
दरम्यान, मराठी चित्रपट उंबरठामध्ये त्यांनी भूमिका साकारली होती नुकताच येऊन गेलेला एक था टायगर या चित्रपटातही त्यांनी काम केले होते.
Girish Karnad, veteran actor and playwright, and Jnanpith awardee, passed away this morning. More details awaited pic.twitter.com/YiQT8kCEqD
— ANI (@ANI) June 10, 2019