भिवंडी : बहुजननामा ऑनलाईन – भिवंडी तालुक्यातील रांजनोलीनाका येथील हार्ट ऑर्केस्ट्रा बारच्या मालकावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत बार चालक अमोल बोराडे याने कर्जदारांच्या ससेमिरा चुकवण्यासाठी गोळीबाराचा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले आहे. अमोल बोराडे हाच मुख्य सुत्रधार आहे. पोलिसांनी दोघांना इंदूर येथून अटक केली आहे. ही घटना २८ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास घडली होती.
अमोल बोराटे हा २८ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास बारच्या जवळ सिगारेट ओढत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी अमोल बोराडे याने कोनगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरु केला. त्यावेळी गुन्ह्यातील आरोपी हे इंदुर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी इंदूर तालुक्यातील कांदळी गावातून कपील कथोरे आणि इरफान शेख यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गावठी बनावटीची पिस्टल जप्त केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
कर्जामुळे रचला बनाव
अमोल बोराडे याच्यावर कर्ज असून कर्जदारांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याने हा बनाव रचला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपी आणि अमोल यांच्यातील संभाषणातून घटनेनंतर अमोल आरोपींना सोडवण्यासाठी मदत करणार असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी फिर्यादी आमोल याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान देणेक-यांपासून वाचण्यासाठी बनाव रचल्याचे उघड झाले.
असा रचला बनाव
अमोल याने व्यवसायासाठी अनेक ओळखीच्या लोकांकाडून तीन कोटी रुपये कर्ज घेतले होते. काही महिन्यापासून तो आर्थिक अडचणीत होता. आर्थिक अडचणीतून थोडा वेळ मिळावा यासाठी त्याने हा बनाव रचला होता. कट रचण्यासाठी त्याने यू-ट्युबवर एक व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओत उजव्या पायाला गोळी लागली तर जखमीचा मृ्त्यू होत नाही. हे पाहिल्यानंतर त्याने हा प्रयोग स्वत:वर केला. त्यासाठी त्याने कपिल आणि इरफान यांच्याशी चर्चा करून हा बनाव रचल्याचे उघड झाले. कुभांड पोलिसांनी आरोपींना अटक केली.