बहुजननामा ऑनलाइन टीम – पिंपरी पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस वाहनांना अचानक आग लागल्याने (vehicles-suddenly-caught-
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी पिंपरी पोलीस ठाणे आहे. बाजूलाच चिंचवड स्टेशन चौक असून, काही अंतरावर पेट्रोल पंपदेखील आहे. या आगीमुळे अन्य नुकसान तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी सुमारे 50 चारचाकी वाहने लावलेली आहेत. यात सुमारे 100 हून अधिक दुचाकी वाहने आहेत. ही सर्व वाहने बेवारस, विविध गुन्हेगारी कृत्यासाठी वापरण्यात आलेली असल्याने जप्त केलेली आहेत. मोटारी आणि दुचाक्या असल्यामुळे थोड्या-थोड्या वेळाने स्फोट होत आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली की, कोणीतरी खोडसाळपणे ही आग लावली याचा पिंपरी पोलीस शोध घेत आहेत.