बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार करिना कपूर (Kareena Kapoor) आणि पती अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या घरी आता नवा पाहुणा येणार आहे. सैफ आणि करिना दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. लवकरच तैमुर अली खानला (Taimur Ali Khan) भावंड मिळणार आहे. सध्या करिना तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. सध्या ती आराम करण्याऐवजी काम करताना दिसत आहे. वजन वाढलं असल्यानं तिला चालणं-फिरणं कठीण झालं आहे.
— TimePass (@TimePassTalks) November 9, 2020
करिना रविवारी मेहबूब स्टुडिओत (Mehboob Studios) पोहोचली होती. या स्टुडिओबाहेरील तिचे काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत करिनाचं बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. फोटोत हेही कळून येत आहे की, व्हॅनिटी व्हॅनमधून उतरताना करिनाला काहीसा त्रास होत आहे. आणि व्हॅनच्या पायऱ्या उतरण्यासाठी तिला मदतही घ्यावी लागत आहे.
— TimePass (@TimePassTalks) November 9, 2020
व्हॅनमधून उतरल्यानंतर तिनं फोटोग्राफर्सला पोजही दिल्या. मात्र, तिनं हातानं दुरूनच इशारा करत फोटो काढण्यास सांगितलं.
— TimePass (@TimePassTalks) November 9, 2020
करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला होता. लवकरच ती करण जोहरच्या तख्त या मल्टीस्टारर सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करिनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे. या सिनेमात ती आमीर खानसोबत काम करणार आहे. पुढील वर्षी ख्रिसमसला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
— TimePass (@TimePassTalks) November 9, 2020