वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेत एका महिलेचा धक्कादायक परिस्थितीत मृतदेह सापडला आहे, तिच्या गळ्याभोवती ८ फुटांचा अजगर लपेटला होता. ३६ वर्षीय वृद्ध महिला मध्य-पश्चिमी अमेरिका येथील इंडियाना येथील घरात मृत अवस्थेत आढळली. लॉरा हर्स्ट असे या महिलेचे नाव आहे.
राज्य पोलिस प्रवक्ते सार्जंट किम रिले यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरा हर्स्टचा मृतदेह बुधवारी ऑक्सफर्ड येथील एका घरात सापडला. हर्स्टने जवळपास १४० साप आपल्या घरात ठेवले. इंडियानाच्या बॅटल ग्राऊंडमध्ये हार्स्टच्या गळ्यात ८ फूट (२.४ मीटर) लांबीचा अजगर गुंडाळलेला होता. डॉक्टरांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
रिले यांनी सांगितल्याप्रमाणे हर्स्टच्या शेजारी राहणाऱ्या शेरीफ मुनसन आणि हर्स्ट या दोघांनीही अनेक जातीचे साप पाळले आहेत. शेजारच्यांनी लॉराला जमिनीवर पडताना पाहताच तातडीने पोलिसांना बोलावून त्याविषयी माहिती दिली. रिले म्हणाले की, “अजगरामुळे गळफास लागल्याचे दिसून आले आहे.” दरम्यान मृत्यूची खरी कारणे पोस्टमॉटमनंतर कळू शकतील असेही त्यांनी नमूद केले.
हर्स्टच्या गळ्यामध्ये गुंडाळलेला अजगर शेरीफ यांचा आहे, जो तिच्या घरात शिरला. हर्स्टचा मृतदेह पाहणाऱ्या मुनसन यांनी सांगितले की, त्यांचा मृत्यू एक अतिशय दुःखद अपघात होता. हा अजगर आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळणार्या सर्पांपैकी एक आहे, जो जगातील ३० मोठ्या सापांपैकी एक आहे.
Visit : Policenama.com
- जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार
‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या