हैद्राबाद : वृत्तसंस्था – आंध्रप्रदेशची राजधानी हैद्राबाद मधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या वाकड्या – तुकड्या दातांमुळे महिलेला अत्याचाराला सामोरे जावे लागेल आहे. महिलेचे दात सरळ नसल्याने तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला आहे.
पीडित रुखसाना बेगमने दिलेल्या माहितीनुसार तिचा नवरा आणि सासरकडचे हुंडा मागत होते आणि हुंडा न मिळाल्याने त्यांनी तिला मारहाण केली. रुखसाना बेगमचे २७ जून २०१९ रोजी लग्न झाले आहे. पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार तिचा नवरा कित्येक महिन्यांपासून तिला त्रास देत होता आणि तिचे दात तिरपे असण्याच्या कारणावरून तीन तलाक देत होता. एक दिवस तिने तिच्या नवऱ्याला फोन केला, तेव्हा त्याने आपले आता काहीही संबंध नाहीत, मी आता घटस्फोट घेतला आहे, असे सांगितले. अशी माहिती महिलेने पोलिसांना दिली. तसेच तिला न्याय हवा असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.
हैद्राबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पतीविरूद्ध कलम ४९८ए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंडा कायदे आणि तीन तलाख संबंधित कलम देखील लावण्यात आले आहेत.