नवी दिल्ली –कोरोना विषाणू महामारीशी सगळं जग सामना करत आहे. संकटकाळात प्रत्येकाला कुणाचीतरी मदत लागतेच. त्याचाच प्रत्यय येत आहे. अनेक देश परस्परांना मदत करत आहेत. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला व्हेंटिलेटर देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी एक ट्विट करून ही घोषणा केली. भारतात अमेरिकेच्या तुलनेत कमी प्रमाणात संसर्ग असला तरीही भारतीय प्रशासन भविष्यासाठी सज्ज राहत आहे.
अमरीकी राष्ट्रपति डॉनल्ड ट्रम्प ने भारत को वेंटिलेटर देने की घोषणा की है। अमरीकी राष्ट्रपति ने ट्वीट कर कहा कि दोनों देशों के बीच गहरे मैत्रीपूर्ण संबंध हैं और प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी उनके अच्छे मित्र हैं। #IndiaFightsCorona #कोविड19 #कोरोनावायरस pic.twitter.com/fh5IZrCEMU
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) May 16, 2020
आपली लोकसंख्या मोठी असल्याने जर मोठा प्रादूर्भाव झाला तर तेवढ्या पटीत सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. कोरोना विषाणू थेट फुफ्फुसांवर हल्ला करत असल्याने रुग्ण्याच्या श्वासोच्छवासाच्या यंत्रणेवर आघात होतो. अशावेळी ऑक्सिजन देणे किंवा गरज पडल्यास व्हेंटिलेटर लावावा लागतो. त्यामुळे अमेरिकेने व्हेंटिलेटर दिल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. भारत व अमेरिका या दोन्ही देशांतील संबंध खूपच घनिष्ठ व मैत्रीपूर्ण आहेत. तसंच पंतप्रधान मोदी यांच्याशीही माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत, असे ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधासाठी ट्रम्प यांनी मागणी करताच भारताने ते औषध अमेरिकेला दिले होते.