नवी दिल्ली – कोरोना विषाणूची लस शोधण्यासाठी संपूर्ण जगात संशोधन सुरू आहे. त्याचबरोबर कोरोनाचा शरीरावर होणारा परिणामही अभ्यासला जात आहे. कोरोना झालेल्या रुग्णांच्या शरीरात व्हिटॅमिन D चे प्रमाण कमी असेल तर त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असल्याचे संशोधन आता शास्रज्ञांनी केले आहे.अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील शास्रज्ञांनी चीन, फ्रान्स, जर्मनी,दक्षिण कोरिया, स्पेन, स्वित्झर्लंड, ब्रिटन आणि अमेरिकेतील हॉस्पिटलमधून कोरोना रुग्णांचे वैद्यकीय अहवाल मागवले व त्यांचा तुलनात्मक अभ्यास केला.
त्यातून त्यांना हे लक्षात आले की इठली, स्पेन आणि ब्रिटनमधील नागरिकांचा कोरोनामुळे मोठ्या संख्येने मृत्यू झाला आहे. या सर्वांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता होती. व्हिटॅमिन डी मुळे शरीराच्या प्रतिकारशक्तीला बळ मिळते त्यामुळे ते शरीरात असणे गरजेचे आहे असा निष्कर्षही या शास्रज्ञांनी काढला.