वाशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कायम आहे. आता अमेरिकेने इराणला झटका देत आंतराळ कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो म्हणाले की, “लाँच पॅड स्फोटानंतर अमेरिकेने इराणच्या अंतराळ कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.”
इराणच्या इमाम खुमैनी आंतराळ केंद्रात गुरुवारी झालेल्या स्फोटानंतर अमेरिकेने ही बंदी लागू केली आहे. इतकेच नाही तर अमेरिकेने इराणवर आंतराळ कार्यक्रमाच्या नावाखाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केल्याचा आरोपही केला आहे. असे सांगितले जात आहे की, ट्रंप प्रशासनाने पहिल्यांदाच इराणी आंतराळ एजन्सीवर बंदी घातली आहे.
US imposes sanctions on Iran space program after launch pad explosion, says Secretary of State Mike Pompeo: AFP news agency (file pic) pic.twitter.com/fw64g4fPmc
— ANI (@ANI) September 3, 2019
नुकतेच इराणनेही हे मान्य केलं होतं की, इमाम खुमैमी आंतराळ केंद्रातून सोडण्यात आलेल्या रॉकेटमध्ये उड्डाणापूर्वीच स्फोट झाला होता. इराणच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं होतं की, लाँचिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे लाँच पॅडवर स्फोट झाला होता. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या स्फोटाचा फोटो शेअर केला होता ज्यामुळे अनेक सवाल उपस्थित झाले की, अमेरिकेकडे स्फोटाचे फोटो कसे आले.
https://twitter.com/realDonaldTrump/status/1167493371973255170
डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं होतं की, इराणची आंतराळ मोहिम खराब होण्यात अमेरिकेचा काहीही संबंध नाही. जो फोटो शेअर करण्यात आला आहे तो जुना आहे. इराणचे अध्यक्ष हसन रूहानी यांनी मंगळवारी अमेरिकेशी कोणत्याही प्रकारचा द्विपक्षीय संवाद साधण्यास नकार दिला.
- आरोग्यविषयक वृत्त –
पाणी किती प्यावे, याबाबतचे समज आणि गैरसमज, काय सांगते आयुर्वेद - टॉनिक प्रमाणे काम करते ‘काजूची पावडर’ ,रोज खाल्ल्याने दूर होतात १० अडचणी
- सुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे ‘संतुलित आहार’
- ‘या’ बीया दूधातून घ्या ; थकवा, कमजोरी दूर करा, उर्जा प्राप्त करा, जाणून घ्या
- दूर होईल ‘श्वेत प्रदर’ची समस्या, करा ‘या’ ६ पैकी कोणताही १ उपाय, जाणून घ्या
- पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- नोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे
- गर्भवती महिलांसह ‘या’ ८ लोकांना डास अधिक चावतात, ‘ही’ आहेत कारणे
- ‘हे’ आहे प्रियंका, अनुष्का, करिना, ऐश्वर्या आणि सोनाक्षीच्या सौंदर्याचे गुपित !
- ‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय