कोलंबो : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मुद्द्याला घेऊन जगभरात अपमान करून घेतलेला पाकिस्तान काही केल्या शांत बसण्याचं नाव घेत नाही. प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तान काश्मीर मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. कोलंबोमध्ये युनिसेफने आयोजित केलेल्या मुलांच्या हक्कावर दक्षिण आशियाई खासदारांच्या परिषदेतही पाकिस्तानने हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेस खासदार गौरव गोगोई आणि भाजप खासदार संजय जयस्वाल यांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं.
पाकच्या प्रतिनिधीने काश्मीर मुद्दा उपस्थि करताच गोगोई आणि जयस्वाल यांनी त्यांना थांबवलं आणि जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हटलं. दोन्ही भारतीय खासदारांनी पाकिस्तानमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार तसेच ईश निंदा कायद्याचा गैरवापर याबाबत जाबही विचारला. या घटनेचा पावणेदोन मिनिटांचा व्हिडीओ सोशलवर अपलोड करण्यात आला आहे.
संमेलनात पाकने युनिसेफकडे हस्तक्षेपाची मागणी केली तेव्हा जयस्वाल यांनी म्हटलं की, “बोलणं पाकव्याप्त काश्मीरच्या परिस्थितीवर होणं गरजेचं आहे.” गोगोई म्हणाले की, “मुलांच्या अधिकारासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात असे वर्तन दुर्दैवी आहे.” दरम्यान फोरमचे संचालन करणारे युनिसेफचे सदस्य आणि इतर देशांच्या प्रतिनिधींनी पाकिस्तानी पक्षाला गप्प बसण्यास सांगितले.
- आरोग्यविषयक वृत्त –
पाणी किती प्यावे, याबाबतचे समज आणि गैरसमज, काय सांगते आयुर्वेद - टॉनिक प्रमाणे काम करते ‘काजूची पावडर’ ,रोज खाल्ल्याने दूर होतात १० अडचणी
- सुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे ‘संतुलित आहार’
- ‘या’ बीया दूधातून घ्या ; थकवा, कमजोरी दूर करा, उर्जा प्राप्त करा, जाणून घ्या
- दूर होईल ‘श्वेत प्रदर’ची समस्या, करा ‘या’ ६ पैकी कोणताही १ उपाय, जाणून घ्या
- पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- नोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे
- गर्भवती महिलांसह ‘या’ ८ लोकांना डास अधिक चावतात, ‘ही’ आहेत कारणे
- ‘हे’ आहे प्रियंका, अनुष्का, करिना, ऐश्वर्या आणि सोनाक्षीच्या सौंदर्याचे गुपित !
- ‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय