बहुजननामा ऑनलाईन – उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या ऑफबीट फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. अनेक वेळा त्यांच्या कपड्यांना ट्रोल देखील केले जाते. त्यांचा बदला घेण्यास उर्फी चुकत नाही. उर्फी जावेद कधी देशाच्या प्रश्नांवर बोलते तर कधी महिलांच्या हक्कांवर बोलून सर्वांचे लक्ष वेधून घेते. कालच उर्फीने हिंदुस्तान भाऊला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. खरतर उर्फी जावेदला (Urfi Javed) बिग बॉस ओटीटीमधून लोकप्रियता मिळाली. दरम्यान यानंतर तिने विचित्र कपडे परिधान करून पापाराझींसमोर पोज देण्यास सुरुवात केली. महत्वाजी बाब म्हणजे आता उर्फी ‘एमटीवी स्प्लिट्सविला एक्स-4’ (‘MTV Splitsvilla X-4’) मध्ये सहभागी होत आहे. जेव्हा एका स्पर्धकाने उर्फीवर तिच्या कपड्यांबद्दल टिप्पणी केली तेव्हा तिला उत्तर कसे द्यायचे हे देखील चांगले माहित आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उर्फीचा शोमधील स्पर्धकासोबत वाद
उर्फी जावेदची स्प्लिट्सव्हिलामध्ये एन्ट्री झाल्यानंतर लगेचच तिचे शोमधील स्पर्धक असलेली साक्षी द्विवेदीसोबत (Sakshi Dwivedi) वाद झाले. यावेळी साक्षीने तिच्या स्टाइलबद्दल वैयक्तिक कमेंट केली. मग काय उर्फीने मागेपुढे न पाहता सोशल मीडिया स्टार साक्षीच्या लोकप्रियतेची खिल्ली उडवली आहे. उर्फी साक्षीची थट्टा करत (Urfi makes fun of Sakshi) म्हणाली की, ‘मी तुला साक्षी द्विवेदी ओळखते.. ठीक आहे, 1 मिलियन फॉलोअर्स, 7 हजार लाईक्स.. जा आणि आता तुझा चेहरा बघा.’ पुढे उर्फी साक्षीला म्हणाली की तिने दुसरी वैयक्तिक टिप्पणी केली तर चांगले होणार नाही.
दरम्यान सध्या शोमध्ये उर्फी आणि साक्षी द्विवेदीचा वाद वाढतच चालल्याच पहायला मिळत आहे.
त्यामुळे अशातच आता सनी लिओन आणि अर्जुन बिजलानी यांना त्या दोघाींना ना शांत करावे लागेल.
दरम्यान शोचा प्रोमो शेअर करताना चॅनलने लिहिले की, ‘#IsleOfVenus मधील उर्फी जावेदच्या एंट्रीने टेबल उलटले कारण मुलींना आता मुलांचे लक्ष वेधून घ्यावे लागेल.
यापूर्वी उर्फीने डेटिंग रिअॅलिटी शोबद्दल सांगितले होते की ती या शोची खूप दिवसांपासून फॅन आहे.
ती त्यात सहभागी होण्यास उत्सुक आहे.
महत्वाची बाब म्हणजे स्प्लिट्सविलामध्ये, स्पर्धक त्यांचा आदर्श सामना शोधण्याचा प्रयत्न करतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Urfi Javed | urfi javed entry splitsvilla x4 she takes a contestant when commented her fashion sense
हे देखील वाचा :
Vinayak Mete Accident Case | विनायक मेटे मृत्यूप्रकरणी सीआयडीची मोठी कारवाई, चालकाविरोधात FIR