सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे (Dilip kolhe) आज शिंदे गटामध्ये (Eknath Shinde Group) प्रवेश करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीसाठी (NCP) हा मोठा धक्का मानला जात आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये (Eknath Shinde Group) नवीन नेत्यांची भरती सुरूच आहे, असे म्हणता येईल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाने (Eknath Shinde Group), उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray Group) आणि राष्ट्रवादीला कमजोर करण्याचे काम सुरू केले आहे. उद्धव गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते आधीच शिंदे गटात सामील झाले आहे. आता राष्ट्रवादीचे नेतेही शिंदे गटात प्रवेश करत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे.
आज संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी,
म्हणजेच वर्षा बंगल्यात (Varsha Bunglow) प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
दिलीप कोल्हे हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) अत्यंत जवळचा माणूस मानले जात होते.
पण, पक्षातील स्थानिक नेतृत्वांना कंटाळून आपण शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे दिलीप कोल्हे
यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दिलीप कोल्हे आपल्या समर्थकांसह मुंबईला रवाना झाले आहे.
Web Title :- Eknath Shinde Group | ncp former deputy mayor dilip kolhe will join the shinde group in solapur
हे देखील वाचा :
Pune Crime | पती पत्नीचा वाद मिटविण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचार्याला मारहाण; वारजे पोलिसांकडे FIR