बहुजननामा ऑनलाईन – उन्नाव रेप केसमधील पीडितेच्या कारला अपघात केल्याप्रकरणी भाजपा आमदार कुलदीपसिंह सेनगर त्याचा भाऊ व अजून ८ जणांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रविवारी रायबरेलीमध्ये पीडितेच्या कारला एका ट्रकने जोराची धडक दिली. त्यामध्ये ती पीडित तरुणी आणि तिचा वकील हे दोघे खूप जखमी झाले आहेत. तर या पीडितेच्या २ महिला नातेवाईकांच निधन झालं आहे.
सर्वाच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे आणि उत्तरप्रदेश सरकार यावर काहीच कारवाई करत नसल्याचे आरोपही विरोधी पक्षांनी केले आहेत.
दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. या अपघाताची चोकशी करण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. त्यामुळे पोलिसांनी सरकारला याबद्दल माहिती दिली आहे. पण अजून तसे पत्र पाठवले नाही.
तसेच ही तरुणी आणि तिच्या कुटुंबियांच्या रक्षणासाठी एक पोलीस आणि २ महिला पोलीस तैनात आहेत. मात्र हे पोलीस अपघात झाला तेव्हा तिच्या जवळ नव्हते. असे पोलीस अधीक्षक वर्मा यांनी सांगितले आहे.