बहुजननामा ऑनलाइन – जिल्ह्यातील नारायणगावात गॅस लाईन(gas agency )टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता विनापरवानगी खोदल्यमुळे महेश गॅस एजन्सीला (gas agency )45 लाख 26 हजार 563 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
गॅस एजन्सीने नूतन अष्टविनायक महामार्गाचेही मोठे नुकसान केल्याने यावर सुद्धा कारवाई व्हावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशा प्रकारे विनापरवानगी रस्त्याची तोडफोड करण्यात येते. परिणामी नव्याने बांधण्यात आलेले रस्तेही लवकरच खराब होता.
त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी संबंधितांवर नारायणगाव येथील घटनेबाबत जशी कारवाई झाली तशीच कारवाई व्हावी, अशी अपेक्षा अनेकांकडून केली जात आहे. दरम्यान, बांधकाम विभागाच्या दंडात्मक कारवाईमुळे काम बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नारायणगाव मध्ये मोठे खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.