‘उदयनराजेंचा अपमान केला नाही, ते ‘आपला माणूस’ !’ उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर शिवसेनेने सामन्याच्या अग्रलेखातून त्यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या कॉलर उडविण्यावर टीका केली आहे. शिवसेनेने सामन्याच्या अग्रलेखात लिहिले कि, ‘आता उदयनराजेंना शिस्त लागली आहे. भाजपमध्ये कॉलर उडवणे चालत नाही’. याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्र्यांनी उदयनराजे यांचे कौतुकही करत ते मुक्त विद्यापीठ असल्याचं म्हंटल आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी उदयनराजे यांच्यासंदर्भात लिहिलेल्या अग्रलेखाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
‘भाजपचा डोलारा हा शिस्त, तत्व, संस्कार , नीतिमत्त आणि साधनशुचिता या पंचसूत्रीवर उभा आहे. भाजपच्या व्यासपीठावर, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या समोर कॉलर उडवणे, शिट्या मारणे, नाट्यमय छट्या करणे असे प्रकार चालत नाहीत, राष्ट्रवादीमध्ये असताना शरद पवार यांनी हा बेशिस्तपणा खपवून घेतला असेल, पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिलाच असेल.’ असा सामन्याच्या अग्रलेखात लिहिण्यात आले होते.
या अग्रलेखावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले यांचे कौतुक करत उत्तर दिले होते. त्यानंतर शिवसेनेने या अग्रलेखावर स्पष्टीकरण देताना लिहिले कि, सामना मधील अग्रलेख स्पष्ट मराठी भाषेत लिहिला होता, त्यात कुठेही उदयनराजे यांचा अपमान केला नाही. उदयनराजे हे आपला माणूस आहेत. त्यामुळे आपल्या माणसाकडून अपेक्षा ठेवण्यात काय गैर आहे ?’ असे लिहीत उद्धव यांनी उदयनराजेंचं समर्थन केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिप्रश्न विचारला होता कि, ‘ सामना’ हे वृत्तपत्र आहे, आपण सगळेच पत्रकार आहात, सगळेच लिहितात आणि प्रश्न विचारतात. त्यामुळे प्रत्येकाच्या प्रश्नांची मी उत्तर द्यायची का ? तसेच मुख्यमंत्र्यांनी उदयनराजे यांचं कौतुक करत म्हंटले कि, ‘उदयनराजे हे मुक्त विद्यापीठ आहे. कॉलर उडवणे, हि त्यांची स्टाईल आहे. त्याच्यासारखे प्रत्येकाला जमत नाही. ते व्यासपीठवर असं करत नाहीत , त्यांची ही स्टाईल तरुणांना आवडते, मला कॉलर उडवणं जमत का ? आणि जमणार पण नाही , ‘ अश्या शब्दात त्यांनी उदयनराजे यांचं समर्थन केले.
Comments are closed.