बहुजननामा ऑनलाईन – चंदीगडच्या लल्लन शहराची कॅरम खेळाडू निधी गुप्ताची भारतीय कॅरम संघात निवड कऱण्यात आली आहे. या संघात निवड करण्यात आलेले खेळाडू भारत मालदिवमध्ये होणाऱ्या टेस्ट सिरीज ज्यूनियर कॅरम चॅम्पियनशिप मध्ये भाग घेतील. मालदिवमध्ये ५ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत या टेस्ट सिरीज होतील.
ऑल इंडिया कॅरम फेडरशनने निधीची निवड केली आहे. निधीने ४६ व्या ज्युनियर नॅशनल अॅड इंटर स्टेट कॅरम चॅम्पियनशिपमधील उत्कृष्ट कामगिरी करुन विजेतेपद पटकावले. याच कामगिरीच्या आधारावर तिची निवड भारतीय संघात करण्यात आली आहे. यापुर्वीही तिने भारताचे प्रतिनिधीत्व करुन पुरस्कार मिळविले आहेत.
निधीने या स्पर्धामध्ये मिळवले आहे यश
– २०१७ च्या इंडो मालदिव टेस्ट सिरीज मध्ये विजेतेपद पटकावले आहे.
– २०१४-१५ च्या ४३ व्या ज्युनियर नॅशनल मध्ये तिसरे स्थान मिळवले आहे.
– २०१४-१५ च्या ४२ व्या ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची मानकरी.
– सी.बी.एस.ई मध्ये दिल्ली २०१४- १५ सुवर्ण पदक
– सी.बी.एस.ई मध्ये दिल्ली २०१५- १६ सुवर्ण पदक
– २०१३-१४च्या ४० व्या सब ज्युनियर नॅशनलमध्ये तिसरे स्थान मिळविले आहे.