नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने समता सैनिक दलाचे द्विदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन दीक्षाभूमी येथे उत्साहात पार पडले. या संमेलनात १५ वर्षांपासून काम करणाऱ्या सैनिक व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. अधिवेशनाच्या समारोपाला संविधान चौक ते दीक्षाभूमी अशी समता रॅली काढण्यात आली. रॅलीत समता सैनिक दलाचे जवान लक्ष वेधून घेत होते. समता सैनिक दलाच्या ९२ व्या स्थापनादिनानिमित्त संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला राष्ट्रीय महासचिव एम. आर. राऊत यांच्या हस्ते माल्यार्पण करून संविधान चौक ते दीक्षाभूमीपर्यंत बाइक रॅली काढण्यात आली. दीक्षाभूमी येथील सभागृहात राष्ट्रीय जीओसी. प्रदीप डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात भदन्त नागदीपंकर मार्गदर्शक, एम. आर. राऊत राष्ट्रीय महासचिव अमरदीपंकर राष्ट्रीय अतिरिक्त महासचिव, विलास गजघाटे सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, संघप्रिय नाग राष्ट्रीय ट्रेनिंग चीफ, राजकुमार वंजारी विदर्भ असो. जीओसी. सत्या सहारे राष्ट्रीय सदस्या, सी. टी. मेश्राम असि. ट्रेनिंग चीफ, प्रमोद खांडेकर, असि. जीओसी नागपूर यांनी मार्गदर्शन केले. संचालन पृथ्वी मोटघरे नागपूर जिल्हा जीओसी यांनी केले.
याप्रसंगी शांता बनकर, इंदू थूल, पपिता बुचडे, मालती माटे, श्वेता गणवीर, रमा उके, रेखा बागडे, जासुंदा मेश्राम, उषा हाडके, सुनीता गेडाम, द्वारका मेश्राम, नानू हाडके, सुशीला गेडाम, ज्योती मेश्राम, त्रिवेणी धरगावे, शोभा मेश्राम, श्यामला वासनिक, कुसुम मेंढे, शीला गजघाटे, लक्ष्मी मानकर, शशी पाटील, कोमल मेश्राम, वनमाला वंजारी, आकाश मोटघरे, संघपाल डोंगरे, बी. एम. बागडे, भावेश माटे, रूपेश थूल, धम्मा सोनटक्के, गोपाल गोंडाणे, नरेंद ्र रामटेके, सिकंदर गजभिये, जनार्दन सुखदेवे, सुरेंद्र चव्हाण, निरंजन नगरारे, शशांक वाघमारे, रोशन नागदेवे, पंकज माटे, मुन्ना नागदेवे, नरहरी मोटघरे, अजय बन्सोड, राहुल राऊत, बबन गायकवाड, युवराज बडगे आदी उपस्थित होते.