वॉशिग्टन : वृत्तसंस्था – वारंवार सूचना देऊनही विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नियमांचा भंग केल्याने ट्रम्प याचे अधिकृत सरकारी ट्विटर अकाऊंट @पॉटस POTUS account वर एक संदेश पोस्ट करुन हे अकाऊंट कायमचे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी वाशिंग्टन डीसीमधील संसदेवर हल्ला केल्याप्रकरणाचा अमेरिकन लोकांनी गंभीर दखल घेतली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा अधिकृत अकाऊंटवरुन अनेकदा आक्षेपार्ह ट्वीट टाकण्यात आले होते.
ट्विटरने त्यांना अनेकदा सूचना, इशारे देऊन त्यांचे अनेक ट्वीट डिलिट केले आहे़ या सर्वांचा आढावा घेऊन हिंसाचाराच्या आणखी चिथावणी देण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याने आम्ही हे खाते कायमचे निलंबित केले आहे, असे ट्विटरने एका निवेदनात म्हटले आहे.
प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेटस या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटचे ८८ दशलक्ष फॉरअर्स आहेत. ट्विटरच्या या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी टिका केली आहे. मुक्त भाषणावर बंदी घालण्यात ते पुढे गेले आहेत. ट्विटर कर्मचार्यांनी माझा आवाज बंद करण्यासाठी माझे खाते त्यांच्या व्यासपीठावरुन काढून टाकण्यासाठी डेमोक्रॅटस आणि रॅडिकल डाव्यांशी समन्वय साधला आहे.
आपल्याला ७ कोटी ५० लाख अमेरिकनांनी मतदान केले आहे. त्यांचा हा अपमान आहे. ट्विटर ही एक खासगी कंपनी आहे. ट्विटरला टक्कर देण्यासाठी नवीन कंपनी उभी करण्याचा आणि आमची स्वत:चा प्लॅटफॉर्म तयार करण्याची घोषणा लवकर करणार आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे.