बहुजननामा ऑनलाइन – नागिन फेम अॅक्ट्रेस अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) लवकरच आई होणार आहे. अनिता सोशल मीडियावर कायमच अॅक्टीव असते. गेल्या काही दिवसांपासून ती सोशलवर तिचे काही फोटो शेअर करत आहे. अशातच तिचे काही नवीन फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होत आहेत. अनितासोबत तिचा पती रोहित रेड्डी (Rohit Reddy) हाही यात दिसत आहे.
अनितानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. अनिताचं हे नवीन फोटोशुट आहे. अनिताचं प्रेग्नंसी मधील हे बोल्ड फोटोशुट सध्या खूप चर्चेत आहे. एका फोटोत ती पतीसोबतही रोमँटीक पोज देताना दिसत आहे. फोटो शेअर करताना तिन खास कविताही लिहिली आहे.
अनिताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. तिचा प्रेग्नंसीवाला बोल्ड अवतार सर्वांनाच आवडला आहे.
अनिता आणि रोहित यांनी 2013 साली लग्न केलं होतं. लग्नाच्या 7 वर्षांनंतर 39 व्या वर्षी ती आई होणार आहे. सध्या ती प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत आहे आणि खूप खुश आहे.
अनिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं ये है मोहब्बतें मध्ये आणि सुपरनॅचरल शो नागिनमध्ये काम केलं आहे. या मालिकेत तिनं नागिनची भूमिका साकारली होती.