सांगली : बहुजननामा ऑनलाईन – सांगली जिल्ह्यात भर दिवसा तिघांचा खून (Triple murder in Sangli) झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील (Palus taluka) दुधोंडी येथे तिघाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून (Triple murder in Sangli) करण्यात आला. ही घटना दुधोंडी (dudhondi) येथील वसंतनगर भागात घडली. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून गावात तणावाचे वातावरण आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अरविंद साठे Arvind Sathe (वय -52), विकास मोहिते Vikas Mohite (वय -32), सनी मोहिते Sunny Mohite (वय -28) असे खून झालेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे बोलले जात आहे. तसेच जयंती साजरी करण्यावरुन दोन गटामध्ये वादा झाल्यामुळे हा प्रकार घडला असावा असेही सांगण्यात येत आहे.
तिघांच्या हत्येपूर्वी दुधोंडी येथील मोहिते आणि साठे गटामध्ये तुफान हाणामारी झाली होती. वाद झाल्यावर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. आज सकाळी सातजण पोलीस ठाण्यात जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी दोन गटातील वाद टोकाला गेला. हे वाद एवढे टोकाला गेले की धारदार शस्त्राने वार करुन तिघांचा खून करण्यात आला. तर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Web Tital : triple murder in sangli three men murdered at dudhondi palus in sangli district police arrested 6 accused
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Uddhav Thackeray | धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा (व्हिडिओ)