मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात आज (रविवार) 06 हजार 479 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 04 हजार 110 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60 लाख 94 हजार 896 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.59 टक्के झाला आहे. आज 157 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 32 हजार 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे (Coronavirus in Maharashtra) मृत्यू होण्याचे प्रमाण (Case Fatality Rate) 2.1 टक्के इतका झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात सध्या 78 हजार 962 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 4 कोटी 81 लाख 85 हजार 350 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 63 लाख 10 हजार 194 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 04 लाख 67 हजार 986 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 3 हजार 117 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.
https://twitter.com/PIBMumbai/status/1421832472040394756?s=20
पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 256 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 333 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 12 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 05.
– 221 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 487421.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2412.
– एकूण मृत्यू – 8774.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 476235.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6617.
पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 190 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 163 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात एकही मृत्यू नाही
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 264726.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 956.
– एकूण मृत्यू – 4344.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 264726.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4994.
Web Tital : coronavirus in maharashtra 6479 new corona patients discharged 4110 discharged in last 24 hours in the state
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Uddhav Thackeray | धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा (व्हिडिओ)