अमरावती : समाचार ऑनलाईन – सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील बोधीसत्व डॉ. बी. आर. आंबेडकर, धम्म संस्कार केंद्र आम्रवन महाविहार येथे अकराव्या बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.२४) पाथरी येथील भदंत शरणानंद महाथेरो हे धम्म परिषदेच्या समारंभाचे अध्यक्ष राहणार आहेत. तर उद्घाटक म्हणून पूर्णा येथील भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच धम्मदेशनासाठी भदंत करूणानंद थेरो, ज्ञानरक्षित, भदंत बोधीशील, भदंत विमलकीर्ती, भदंत काश्यप थेरो, भदंत मुदितानंद, भदंत पयानंद, भदंत सारिपुत्त थेरो, भदंत सुमेध बोधीथेरो आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आ.विजय भांबळे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.अध्यक्षा उज्ज्वला राठोड, नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिंतूरचे नगराध्यक्षा साबिया बेगम कपिल फारुकी, जि.प.सभापती अशोक काकडे, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, पं.स.सभापती पुरुषोत्तम पावडे, जिंतूर पं.स.सभापती इंदुमती भवाळे, जि.प.सदस्य राजेंद्र लहाने, ॲड.बालासाहेब रोडगे, गोरख भालेराव, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, जिंतूरचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आज सायंकाळी ६ वाजता सुप्रसिध्द गायक मिलिंद शिंदे यांच्या बुध्द भीमगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेस समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष अशोक अंभोरे यांनी केले आहे.