सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य अक्कलकोट शहर व तालुका शाखेच्या वतीने कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी उद्या सोमवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुण लोणारी, तालुकाध्यक्ष ऋषिकेश लोणारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी ११ वाजता ए-वन चौक हुतात्मा स्तंभ येथून तालुक्यातील कोळी बांधवांच्या वतीने मोर्चाव्दारे निघून कांदा बाजार, विजय कामगार चौक, पंचायत समिती सोलापूर रोडवर हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांना अनुसूचित जमातची शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र शाळेतच मिळावे, विद्यार्थ्यांना पुर्ण शिक्षण होईपर्यंत जातीचे दाखल मागणी करु नये, ५० वर्षापूर्वीचा जातीचा दाखल्याचा पुरावा मागणी करु नये आदींसह विविध मागण्यांचा यात समावेश आहे. या मागण्या संदर्भात गांभीर्याने विचार न केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुण लोणारी यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा नेते बसवराज कोळी, शहर अध्यक्ष श्रीशैल रोडगे, अशोक लोणारी, सचिव दशरथ मुली, भीमा करजगी, श्रीकांत कोळी, गुंडप्पा कोळी, बालाजी शापवाले, महादेव कामनूरकर, गणेश शापवाले, राम लोणारी, महिला आघाडी शहर अध्यक्षा तुळसाबाई गिरबोने, ता.अध्यक्षा सुमन अमिनभावी आदी उपस्थित होते. दरम्यान, या आंदोलनास तालुक्यातील विविध संघटनेने पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. यामध्ये रासपाचे जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर, भारिपचे तालुकाध्यक्ष शिलामणी बनसोडे, देवानंद अस्वले, सिध्दार्थ गायकवाड आदी पक्ष व संघटनांचा समावेश आहे.