मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सोने -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सप्टेंबर महिन्यातील आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं आणि चांदी स्वस्त होणार आहे. आज दिल्लीत सोन्याच्या किमतीत ३०० रुपयांची घट झाल्याने आता १० ग्रॅम सोन्याची किंमत ३९,२२५ रुपये झाली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलरच्या तुलनेत मजबूत झालेला रुपया आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या भाव वाढीमुळे सोन्याची मागणी कमी झाल्यानं ही घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोनं १, ५०६ डाॅलर प्रति औंस असून चांदी १८. ०५ डाॅलर प्रति औंस आहे.
आज दिल्लीत चांदीच्या किमतीतही १४०० रुपयांची घसरण झाली असून १ किलोग्रॅम चांदीची किंमत ४८,५०० रुपये झाली आहे. त्याचबरोबर ९९. ९ टक्के सोन्याच्या किमतीत ३०० रुपयांनी घट झाली आहे. सिक्का कारभाऱ्यांमध्ये लिवाली कमी झाल्यानं चांदी घसरली असल्याचं समजले आहे. आज डाॅलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला असून १४ पैशांच्या मजबुतीनं डाॅलरच्या तुलनेत रुपया ७१.५८ रुपये झाला आहे. शनिवारी सोनं ३९,५२५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ४९, ९०० रुपये प्रति किलोग्रॅम होती.
दरम्यान दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर १ हजार ५०० डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत ३६ हजारच्या पुढे तर चांदीचे दर ४२ हजारपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो, असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील सराफ बाजारात व्यक्त केलेल्या अंजादानुसार यंदाच्या दिवाळीत सोन्याचे दर तेजीत असणार असून दिवाळीपर्यंत सोने ३८ हजारावर जाण्याची शक्यता आहे. तर चांदीचे दर ४५ हजारावर पोहोचू शकतात.