बहुजननामा ऑनलाईन : चांगल्या नोकरीच्या शोधात एका व्यक्तीने एका मुलीला चक्क दिल्लीच्या देहविक्री व्यापार चालणाऱ्या कोठ्यावर विकले, या ठिकाणी त्या मुलीवर देहविक्रीसाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना दिल्लीच्या जीबी रोडवरील आहे. माहिती मिळताच मुलीचा भाऊ ग्राहक म्हणून प्रथम तिथे पोहचला, त्यानंतर संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीनंतर दिल्ली महिला आयोग आणि पोलिसांनी छापा टाकून मुलीला मुक्त केले.
पोलिसांनी व्यापार चालवणाऱ्याला ताब्यात घेतले. पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या या महिलेने एका सुप्रसिद्ध कंपनीत नेटवर्किंगचा व्यवसाय करत होती. या मुलीला एका व्यक्तीने ८ जून रोजी नोकरीची अमिश दाखवून तिला दिल्लीत घेऊन आला. तिच्या भावाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर महिला आयोग आणि कमला मार्केटच्या पोलिसांनी छापा टाकत व्यवसाय चालवणाऱ्यांना ताब्यात घेतले.
भावाने सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्याच्या बहिणीचा फोन दिल्ली येथे बंद झाला, खूप शोध घेतला तरी बहिणीचा तपास लागत नव्हता. अचानक त्याला एका व्यक्तीचा फोन आला व त्या व्यक्तीने सांगितले की, तुझी बहीण दिल्लीच्या जीबी रोडवरील एका कोठ्यावरती आहे. त्यानंतर भावाने तात्काळ दिल्लीला येऊन महिला आयोग आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपल्या बहिणीची सुटका केली.