‘रिपाइं’मधील एकाधिकारशाही मोडून काढू : अशोक सरवदे

रिपब्लिकन पार्टीच्या वतीने येथील शहाजीराव पाटील सभागृहात तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर जिल्हा कार्याध्यक्ष अजित गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सुरज बनसोडे, नागेश कांबळे, किर्तीपाल गायकवाड, दीपक चंदनशिवे, दयानंद धाईंजे, नागेश भोसले, गौतम क्षीरसागर, राहुल तावसकर, दीपक गवळी, भीमराव वजाळे, अरुण बनसोडे, मार्तंड काळे, अमोल कापुरे, महेश कसबे आदींसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. अशोक सरवदे म्हणाले की, सध्या जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचे काम केले जात आहे. तर स्वाभिमानी कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. महामंडळाच्या नावाखाली आर्थिक लूट केली जात आहे.
यावेळी आनंद कुचेकर, अमोल जगताप, आबासाहेब कुचेकर, अरूण कदम, अभिजीत लोंढे, विठ्ठल जंवजाळ, मरगा साबळे, काकासाहेब फडतरे, हरी जगताप, सिताराम फडतरे, सुरेश गायकवाड, आनंद सरवदे, बाळासाहेब तडसरे, आपा सलवदे, विलास सर्वगोड, कीर्तीपाल सर्वगोड, महेश कसबे, सतीश पोळ, दत्ता वाघमारे, समाधान भोसले, अमर बेडेकर, बंडू माने, स्वप्नील ओहोळ, सुभाष जानराव, दत्ता माने, सदाशिव काबळे, समजीक कारंडे, दगडु खरात, आपा वाघमारे, बाळासाहेब कसबे, सत्यवान जवंजाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावर प्रतिक्रिया देताना राजा सरवदे, प्रदेश सरचिटणीस, रि.पा.इं. (ए) यांनी म्हटले की, दि. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी खा. रामदास आठवले यांनी माझ्यावर टीका करणाऱ्यांसमोरच सोलापूरची कार्यकारिणी बदलण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मी ही कार्यकारिणी बदलली आहे. ना. आठवले यांनी मला महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले. मी जर एकाधिकारशाहीने वागलो असतो तर ते महामंडळ मला त्यांनी दिले असते का? पक्षातून काढून टाकण्यात आल्याने पक्षाच्या नावावर चालू असणाऱ्या अनेकांच्या चोऱ्या-माऱ्या सध्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे खचलेल्या मानसिकतेतूनच त्यांचे हे उद्योग सुरू आहेत. माझ्यावर टीका करण्याइतकी त्यांची लायकी आहे का? हे त्यांनी आरशासमोर उभे राहून स्वत: ला विचारावे.
Comments are closed.