नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – जिल्यातील संभाजीनगर परिसरातील भोर मळा येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील गॅस सिलिंडरचा स्फोटात ३ वर्षांच्या चिमुरड्यासह आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाची तीव्रता एवढी भयानक होती की, सर्व कुटुंब यात गंभीररित्या होरपळून निघाले. घटनेनंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान ३ वर्षांचा अथर्व, आई नम्रता कांबळे (वय-४०) यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर,मंगळवारी नरसिंग कांबळे (वय-४४) त्यांनीही प्राण गमावला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंह कांबळे हे पत्नी, तीन मुलांसह नाशिक रोड परिसरातील रेल्वे ट्रॅक्शनसमोर असलेल्या संभाजीनगरातील भोर मळा येथे राहत होते. शुक्रवारी नम्रता कांबळे नेहमीप्रमाणे सकाळी गॅस पेटवण्यासाठी गेल्या असता गळतीमुळे मोठा सिलिंडरचा मोठा भडका उडाला. या स्फोटाची दाहकता जास्तच भयानक असल्याने संपूर्ण कुटुंब यात गंभीररीत्या होरपळले.
सगळ्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, ७० टक्के भाजल्याने अथर्व आणि नम्रता कांबळी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कार होत नाही तोवर नरसिंह कांबळे यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आता मुलगा निखिल नरसिंग कांबळे आणि नेहा नरसिंग कांबळे असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Visit : bahujannama.com