नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत NDA प्रणीत भाजप सरकारने घवघवीत यश मिळवले असून सलग दुसऱ्यांदा भाजप सरकार सत्तेत आले आहे .तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज मोदी सरकारमधील मंत्रीगण मंडळ पदाची शपथ घेणार आहे. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळात नेमके कोणाची वर्णी लागणार आहे याबाबत अजून सस्पेन्स कायम आहे. अशामध्येच रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, मागील वर्षी भाजप सरकारने माझ्यावर विश्वास दाखवत मला मंत्री पद दिले होते तसेच यावेळेही मोदीजींच्या मंत्रिमंडळात माझा समावेश असेल. मला आज त्याविषयी फोन येण्याची आशाही आहे. मला देशाची सेवा करण्याची आणखी एक संधी मिळेल असे मला वाटते आहे. मला चांगली जबाबदारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, रामविलास पासवान, अनुप्रिया पटेल आणि अरविंद सावंत यांच्या नावावर केंद्रीय मंत्री म्हणून जवळजवळ शिककामोर्तब झाले आहे.