पटना : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादाच्या नावाखाली अनेकांना जबरदस्तीने पाकिस्तानात पाठवणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला आहे. पाकिस्तान टूर अँड ट्रॅव्हल्स विभागाचे व्हिसामंत्री गिरीराज सिंह नवादा मतदार संघामधून तिकीट न देता बेगुसराय मतदार संघामधून दिल्याने ते दुखावले आहेत. अशी टीका कन्हैया कुमार यांनी भाजपचे केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हे सध्या नवादा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. मात्र बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि लोकजनशक्ती पार्टी यांच्यात झालेल्या जागावाटपामध्ये ही रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला गेलाय आहे. त्यामुळे गिरिराज सिंह याना नवादा येथील उमेदवारी न देता बेगुसराय येथे मतदार संघाची उमेदवारी दिल्याने ते नाराज आहेत. तिथे विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्याशी थेट आमना-सामना होणार असल्याने गिरिराज सिंह हे लढण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे.