पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेच्या तोंडावर पुण्यात भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या प्रचारसभेत मुख्य वक्ते प्रकाश जावडेकर यांच्या भाषणाच्या आधीच अनेक श्रोत्यांनी बाहेरचा रस्ता धरल्याचे चित्र बघायला मिळाले. काल संध्याकाळी जावडेकर यांचे भाषण उशिरा सुरू झाल्याने लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली त्यांच्याआधी अनेक भाषणे झाल्याने श्रोत्यांनी विशेषतः महिला वर्गाने काढता पाय घेतल्याचे दिसून आले. भाजपच्या बाणेर बालेवाडी भागातील एका नगरसेवकाने काही नागरिक बसमधून सभेसाठी आणले होते. मात्र नागरिक उठल्यावरही संबंधित नगरसेवकाने नाईलाजाने नागरिकांना सभा संपण्यापूर्वी बसमधून लोकांना घरी सोडले.अर्थात खच्चून भरलेली सभा रिकामी होताना नगरसेवक आणि आमदारांची चलबिचल सुरू होती.अखेर बापट स्वतः उभे राहिल्यावर त्यांनीच वेळेचं भान राखत कमी बोलणार असे सुरुवातीला त्यांनी सांगितले. देशाला सुरक्षित ठेवायचे असेल तर नरेंद्र मोदींना निवडून दिले पाहिजे ही निवडणूक देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्वाची आहे.काँग्रेसला भारत माता की जय म्हणायला बंदी नाही पण ते म्हणत नाहीत हि शोकांतिका आहे .