बहुजननामा ऑनलाईन – रेल्वे प्रशासन आपल्या प्रवाशांच्या सुख सुविधांकडे विशेष लक्ष देत असते. त्यासाठी रेल्वे प्रशासन तत्परतेने कामही करत असते. प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन आपल्या इन्फ्रा स्ट्रक्चरमध्ये वारंवार बदल हे करतच असते. प्रशासनाने वर्षाच्या सुरुवातीलाच इंजन लैस हाईस्पिड ट्रेन ‘वंदे भारत’ची सुरुवात केली होती. तर काही दिवसांआधीच रेल्वेकडून दिल्ली- मुंबई आणि दिल्ली – हावडा रूट वर १६० किलोमीटर प्रति ताशी स्पीडने रेल्वेच्या संचलनासाठी मंजुरी देण्यात आली होती. तर आता भारतीय रेल्वेने १८० किमी प्रति ताशी स्पीडने पाळणारे इंजिन तयार केले आहे.
प्रीमियम रेल्वेच्या वेगासाठी फायदा
प्रीमियम आणि शताब्दी सारख्या रेल्वे गाड्यांमध्ये हायस्पीड पद्धतीचे इंजिन बनवले गेले तर या गाड्यांचा वेग वाढण्यासाठी खूप मदत होणार आहे. यामुळे कमी वेळेत जास्त अंतर गाठण्यात याचा फायदा होऊ शकतो. भारतातच पूर्ण पणे हे इंजिन बनवले जाणार आहे. हे इंजिन पश्चिम बंगालच्या चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स फॅक्ट्रीमध्ये बनवण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
Railways has manufactured a high speed locomotive in West Bengal's Chittaranjan Locomotive Works, achieving a top speed of 180km/hr.
This new locomotive produced under 'Make In India' initiative, will speed up trains like never before.
Watch the video: pic.twitter.com/E5QCi0dSa7
— Piyush Goyal (@PiyushGoyal) August 12, 2019
रेल्वे मंत्री पियुष गोयलनी केले ट्विट
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून सांगितले की, मेक इन इंडिया या योजनेअंतर्गत हे इंजिन बनवण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेला आता चांगली गती मिळणार आहे. गोयल यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये स्पीड मीटर मध्ये प्रति १८० किमी असा काटा सुद्धा दिसून येत आहे.