बहुजननामा ऑनलाईन – जिओने देशातील टेलिकॉम सेक्टरमध्ये सगळ्यात मोठी कंपनी बनल्यानंतर आता जिओ ५ सप्टेंबर रोजी फायबर सर्व्हिस सुरु करण्याची शक्यता आहे. गीगाफायबर सर्व्हिस सुरु करण्याची घोषणा गेल्या वर्षी जिओने केली होती. आता ही सर्व्हिस एका महिन्यात युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. याचा फटका मात्र इतर कंपनीना बसणार आहे. त्यात एअरटेल, BSNL अशा कंपनींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पण हे प्लॅन सध्यातरी जाहीर झालेले नाही. परंतु कंपनीने बेसिक प्लान ७०० रुपयांचा तर प्रीमियर प्लान १० हजार रुपयांपर्यंत असणार असल्याची घोषणा मात्र करण्यात आली आहे. जिओफायबरच्या प्लानमध्ये १००Mbps पासून १Gbps ची स्पीड मिळणार आहे.
एअरटेल प्लान
चार प्लान एअरटेल ब्राँडबँड सर्व्हिस ऑफर करत आहे. त्यात बेसिक प्लॅनमध्ये ४०Mpbs स्पीड सोबत १००GB डेटा एका महिन्यासाठी मिळतो. कंपनी या प्लानला ६ महिन्यांसाठी २०० अतिरिक्त डेटा देत आहे, तसेच १, ०९९ रुपयांच्या प्लान मधून एका महिन्यासाठी ३०० GB डेटा सोबत ५००GB बोनस डेटा मिळतो. त्याचबरोबर या प्लान मध्ये १०० mbps ची स्पीड उपलब्ध आहे. १,५९९ रुपयांच्या प्लान मध्ये युजर्सला ६०० GB डेटा सोबतच १००० GB बोनस डेटा दिला जातो.
बीएसएनएल प्लान
युजर्सला बीएसएनएल ब्रॉ़डबॅंड सर्विसमध्ये आपल्याला ७७७ रुपयांपासून १६,९९९ रुपयांपर्यंतचे प्लान ऑफर केले आहेत. बेसिक प्लान बीएसएनएलचा ५० Mbps स्पीडचा आहे. ५०० GB डेटाची यामध्ये लिमिट आहे. तर १,२७७ रुपयाच्या प्लानमध्ये १०० Mbps च्या स्पीडसोबत ७५० GB डेटा मिळतो.