बहुजननामा ऑनलाईन – रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना सण – उत्सव येण्यापूर्वीच आनंदाचा धक्का दिला आहे. रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या वर्कशॉप कर्मचाऱ्यांना आणि उत्पादक कर्मचाऱ्यांना सरप्राईझ देत डबल इन्सेन्टिव्ह बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना दोन वर्षांचा एरिअर सुद्धा दिला जाणार आहे. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे या आधी रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस दिला जात नव्हता. तर आता हा बोनस वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वाढवण्यात येणार आहे.
१ जुलै पासून इन्सेन्टिव्ह बोनस सुरु करण्यात येणार आहे. याच हिशोबाने कर्मचाऱ्यांना एरिअरची चंगली रक्कम मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना आधी ६,७६० इतका बोनस मिळायचा तो आता सातव्या वेतन आयोगानुसार १२, १६८ इतका मिळावा अशी शिफारस करण्यात आली आहे.
याअंतर्गत ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे महासचिव शिवगोपाल मिश्रा यांनी सांगितले की, इन्सेन्टिव्ह बोनस पुन्हा सुरु करण्यासाठी रेल्वे मंत्रालयावर खूप आधी पासूनच दबाव टाकण्यात येत होता. यामध्ये इन्सेन्टिव्ह बोनस भत्यामध्ये बदलाची मागणी करण्यात आली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिह यांनी चाईल्ड केअर लिव्हला देण्यात आलेली मजुरी ही भारतीय रक्षा सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे.