बहुजननामा ऑनलाइन : आयकर विभाग (INCOME TAX ) अर्थ मंत्रालयाकडून सांगिलतलेले बदल आपल्या नियमात प्रत्येकी वेळी करत असते. आयकर भरणे हे आपले, कर्तव्य आहे, हे आवाहन देखील सतत करत असते. आयकर विभागाचे हे नियम प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळे असतात, जेष्ठ नागरिकांसाठी असणारे नियम , सामान्य नागरिकांसाठी वेगळे असतात. तसेच जेष्ठ आणि अति जेष्ठ नागरिकांसाठी देखील वेगळे असतात , तसेच त्यांचा सोयी- सुविधांत देखील अनेक फायदे असतात.
जाणून घेऊया या संदर्भातील आणखी माहिती :
६० वर्षांपुढील आणि ८० वर्षां आतील व्यक्ती जेष्ठ नागरिक वयोगटात असतात , याचबरोबर ती भारतीय नागरिक असणे देखील महत्वाचे असते. कारण भारतीय जेष्ठ नागरिक आणि जेष्ठ एनआरआय नागरिक यांना आयकर अधिकारात अधिक सूट मिळते.
भारतात रहिवासी असणाऱ्या नागरिकास ३ लाखांपर्यंत सूट मिळते, तर बाहेरील एनआरआय साठी ती सूट २,५०,००० पर्यंत असते.त्यामुळे भारतीय रहिवाशी असणाऱ्या जेष्ठ नागरिकास ५०००० पर्यंत जास्त लाभ होतो. ८० आणि त्या पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती अति जेष्ठ नागरिक ठरतात. या नागरिकांना भारतीय रहिवासी असणे तसेच Form ITR 1/4 भरून या सुविधांचा लाभ घेणे महत्वाचे आहे. अति जेष्ठ नागरिकांना ५, ००,००० रुपयांचे उत्पन्न असल्यास कोणताही के भरावा लागत नाही. तर अनिवासी अति जेष्ठ नागरिकांस २,५०,००० रुपयांची सूट मिळते. त्यामुळे भारतीय असणाऱ्या अति जेष्ठ नागरिकास २,५०,००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळते. तुम्ही तुमचा आयकर रिटर्न ऑनलाईन किंवा आयकर विभागाच्या जवळच्या कार्यालयात जाऊन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच आपला आयकर वेळीच भरणे गरजेचं आहे, आयकर विभागाने दिलेल्या वेळेचे उल्लंघन केल्यास आपल्या दंड देखील आकारण्यात येतो.