बहुजननामा ऑनलाईन – हरियाणाच्या यमुनानगरमधील एका युवकाची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने चक्क आपली बीएमडब्ल्यू कार कालव्यात टाकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या वडिलांनी त्याला जॅग्वार कार घेण्यास नकार दिल्याने तरुणाने हे पाऊल उचलले. यानंतर या तरुणाला राग आला त्यामुळे त्याने कालव्यामध्ये जाऊन स्वत: ची बीएमडब्ल्यू कार कालव्यात फेकली.
त्या युवकाने कालव्यात टाकलेली बीएमडब्ल्यू कार कालव्याच्या मध्यभागी वाहून गेली आहे. गोताखोरांच्या मदतीने ही गाडी काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. दादूपुर हेडजवळील पाण्याच्या बेटावर बीएमडब्ल्यू कार अडकल्याचे चित्रांमध्ये दिसून आले आहे. पोलिस त्या युवकाला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. दादूपूर हेडजवळील पाण्याच्या बेटावर बीएमडब्ल्यू कार अडकल्याची माहिती मिळताच ते पाहण्यासाठी लोकांनी जमाव केला आहे. महत्त्वाचे म्हणजे पंजाबमधील तरुणांना महागड्या गाड्यांचा खूप छंद आहे.
हरियाणामधील तरुणांना जॅग्वार आणि लम्बोर्गिनीसारख्या मोठ्या कंपन्यांच्या मोटारी खूप आवडतात. जॅग्वार कारची किंमत सुमारे ४० ते ५० लाख रुपये पासून सुरू होते आणि त्याच्या बर्याच मॉडेल्सची किंमत करोडो रुपये आहे. विशेषत: पंजाबच्या काही भागात जेथे खेड्यापाड्यात विविध प्रकारच्या महागड्या गाड्या आढळतात. बीएमडब्ल्यू देखील स्वस्त कार नाही. त्याची सर्वात कमी किंमतीची कार ३०-३५ लाख आहे. ही कार लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. लक्झरी कारमध्येही याची गणना केली जाते. अशा परिस्थितीत, तरूणाने केलेल्या कृतीमुळे सगळे आश्चर्यचकित झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार मुलाला दर दोन महिन्यांनी महागड्या गाड्या बदलण्याची सवय होती आणि सध्या त्याच्याकडे बीएमडब्ल्यू कार होती.